Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai: कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सध्या लसीकरण मोहिम राबवली जात आहे. तर महाराष्ट्रात दर दिवशी सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून येत असल्याचे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, अशातच आता मुंबई महापालिकेकडून (BMC) रहिवाशी इमारतीमध्ये लसीकरण मोहिम राबवण्याचा विचार केला जात आहे. परंतु यासाठी केंद्राकडून परवानगी मिळण्याची प्रतिक्षा केली जात आहे.(Coronavirus in Mumbai: मुंबई शहरात COVID 19 उद्रेक, दिवसभरात 5 हजार जणांना कोरोना व्हायरस संक्रमण)

मुंबईत सध्या 60 वर्षांहून अधिक वय असलेल्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर महापालिकेच्या 24 लसीकरण केंद्रासह आठ खासगी रुग्णालयात दिवसाला जवळजवळ 41,000 जणांना लस दिली जात आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी बुधवारी असे म्हटले आहे की, महापालिकेकडून रहिवाशी इमारतींमध्ये लसीकरण मोहिम राबवण्यावर विचार केला जात आहे. या संदर्भातील परवानगीसाठी पत्र सुद्धा केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहे. जर केंद्राकडून यासाठी परवानगी दिली गेल्यास मुंबई महापालिका खासगी रुग्णालयांना सुद्धा रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्यासाठी परवानगी देऊ शकते. तत्पूर्वी खासगी रुग्णालयात पुरेश्या वैद्यकिय सोईसुविधा आहेत की नाही ते पाहिले जाणार आहे. संपूर्ण दृष्टीकोनातून याचा विचार केला जाईल असे ही काकाणी यांनी म्हटले आहे.

तर लसीकरणाच्या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच त्याची दोन शिफ्टमध्ये विभागणी केली जाईल. त्यामध्ये पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 7ते दुपारी 2 वाजेपर्यंत. त्यानंतरची शिफ्ट दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचसोबत लसीकरण केंद्रावर 24 तास ही सुविधा देण्याचा सुद्धा परवानगी दिली जाईल. मात्र सध्या लसीकरण केंद्रे ही 5 वाजताच बंद केली जातात. मुंबई महापालिकेच्या मते शहरातील 9.70 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लस दिली गेली आहे.(Coronavirus Epidemic: महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव- केंद्रीय आरोग्य सचिव)

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण हे चाळ किंवा झोपडपट्टी परिसराऐवजी रहिवाशी इमारतीत अधिक आढळून येत आहेत. महापालिकेच्या डेटानुसार, तब्बल 90 टक्के रहिवाशी इमारतीमधील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्याचे दोन महिन्यात समोर आले आहे. त्यामुळे 5 हजारांहून अधिक इमारतीचे मजले सील करण्यात आले आहेत.