देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण (Rajesh Bhushan ) यांनी पत्रकार परिषदेत आज (24 मार्च) देशभरातील कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक अॅक्टीव्ह असलेल्या 10 जिल्ह्यांची यादी सांगितली. यात धक्कादायक बाब अशी की या 10 पैकी नऊ जिल्हे हे महाराष्ट्रातील (Coronavirus in Maharashtra) आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. ही माहिती चिंताजनक असली तरी घाबरुन न जाता काळजी घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात तब्बल 28,000 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. पंजाब राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. प्रामुख्याने पंजाबमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशी माहितीही राजेश भूषण यांनी दिली. (हेही वाचा, Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आढळला कोरोना विषाणूचा E484Q आणि L452R वेरिएन्ट)
महाराष्ट्रात अॅक्टीव्ह रुग्णसंख्या असलेले जिल्हे
-
- पुणे
- नागपूर
- मुंबई
- ठाणे
- नाशिक
- औरंगाबाद
- नांदेड
- जळगाव
- अकोला
The top 10 districts where maximum active cases are concentrated are - Pune, Nagpur, Mumbai, Thane, Nashik, Aurangabad, Bengaluru Urban, Nanded, Jalgaon and Akola. Nine districts from Maharashtra and one fro, Karnataka: Union Health Secretary Rajesh Bhushan#COVID19 pic.twitter.com/xWneLDYb4I
— ANI (@ANI) March 24, 2021
पंजाब, महाराष्ट्र या राज्यांसोबतच गुजरात, मध्य प्रदेश, आदी राज्यांमध्येही स्थिती चिंताजनक आहे. गुजरातमध्ये प्रतिदीन 1700 तर मध्य प्रदेश राज्यात परतिदिन 1500 रुग्ण सरासरी सापडत आहेत. गुजरात राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणांमध्ये सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरचा समावेश आहे. तर मध्य प्रदेश राज्यातही भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्य प्रमाणावर असल्याची माहिती सचिव राजेश भूषण यांनी दिली.