Coronavirus Lockdown in Thane: ठाणे जिल्ह्यामध्ये कंटेन्मेंट झोन साठी लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्यंत कायम!
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये मुंबई पाठोपाठा ठाणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला काही दिवसांपूर्वी पुणे, ठाण्यामध्ये पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन घ्यावा लागला होता. दरम्यान आता ठाणे जिल्ह्यांत केवळ कंटेन्मेट झोनमध्ये 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली आहे. PTI रिपोर्टनुसार, आज (1 ऑगस्ट) दिवशी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी एका व्हिडिओ द्वारा माहिती देताना कंटेन्मेंट भाग वगळता इतर ठिकाणी सवलती देण्यात आल्या आहेत. ठाणे ग्रामीण, ठाणे महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्ये राज्य सरकारची नवी नियमावली आता लागू असेल.

ठाणे प्रशासन पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या कंटेन्मेट झोनमध्ये मात्र नियम कडक असतील. तेथे 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन पाळला जाईल. शुक्रवार (31 जुलै) दिवशी ठाणे मध्ये माजिवडा - मनपाडा भागात 132 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 86 जण हे कन्स्ट्रक्क्शन साईटवर काम करणारे होते. अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान कन्स्ट्रक्शन साईटवर 536 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 86 जणांची RTPCR test पॉझिटिव्ह आली आहे. आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपर्यंत ठाण्यामध्ये 85256 पर्यंत रूग्णसंख्या पोहचली आहे.