Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णांंच्या संंख्येत 20 हजार 489 नव्या प्रकरणांंची भर पडली आहे. यानुसार एकुण कोरोनाबाधितांंची (Total Coronavirus Cases) संंख्या 8,83,862 वर पोहचली आहे. काल पासुन कोरोनामुळे 312 रुग्णांंचा (Coronavirus Death)  बळी गेल्याचे सुद्धा समजत आहे ज्यानुसार एकुण कोरोना मृतांंची राज्यातील संंख्या 26, 276 वर पोहचली आहे. हे आकडे जितके चिंंताजनक आहेत तितकेच कोरोना रिकव्हरी होत असलेल्या रुग्णांंची संख्या सुद्धा दिलासादायक आहे. राज्यात मागील 24 तासात कोरोनाच्या विळख्यातुन 10,801 जण मुक्त झाले आहेत ज्याप्रमाणे आजवर 6,36,574 जण कोरोना मुक्त (Coronavirus Recovered Cases) झाल्याचे समजत आहे. याशिवाय राज्यात कोरोनाचे एकुण 2,20,661 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (COVID 19 Active Cases)  आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे.

(पुणे: कोरोना संकट नियंंत्रणात आणण्यासाठी अजित पवार यांंनी प्रकाश जावडेकर यांंच्यामार्फत केंद्राकडे केल्या 'या' मागण्या)

प्राप्त माहितीनुसार, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 72.01% एवढे झाले आहे तर सध्या राज्यातील मृत्यूदर 2.97% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 45,56,707 चाचण्या पार पडल्या आहेत. सध्या राज्यात 14,81,909 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 37,196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांंना राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जर एखाद्याने ठरवलेल्या रक्कमेहून अधिक पैसे उकळल्यास त्याला बिलाची 5 पट रक्कम दंड आकारला जाऊ शकतो असा इशारा आज आरोग्यमंंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.