पुणे: कोरोना संकट नियंंत्रणात आणण्यासाठी अजित पवार यांंनी प्रकाश जावडेकर यांंच्यामार्फत केंद्राकडे केल्या 'या' मागण्या
Ajit Pawar And Prakash Javdekar (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus In Maharashtra)  शिरकाव जिथुन सुरु झाला त्या पुण्यात (Pune)  आता पुन्हा मागील काही दिवसात परिस्थिती बिघडत चालली आहे. मध्यंंतरी तर पुणे विभागातील एकुण कोरोना रुग्णांंच्या संंख्येने मुंंबईचा आकडा सुद्धा पार केला होता, याच पार्श्वभुमीवर आज केंद्रीय मंंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar)  आणि पुण्याचे पालकमंंत्री व राज्याचे उपमुख्यमंंत्री अजित पवार (AJit Pawar) यांंनी रिव्ह्यु मीटिंंग घेतली होती. सध्या समोर येणार्‍या माहितीनुसार, अजित पवार यांंनी कोरोना रुग्ण असणार्‍या रुग्णालयात CCTV बसवण्याची विनंंती केली आहे. रुग्णांंच्या खोल्यांंबाहेर TV बसवावेत जेणेकरुन नातेवाईकांंना निदान रुग्णांंना बाहेरुन तरी बघता येईल असा हेतु आहे. याशिवाय, ऑक्सिजनचा पुरवठा हा 50-50 टक्के व्हावा जेणेकरुन हेल्थ सर्व्हिस व उद्योगांंना समसमान पुरवठा होईल अशीही मागणी पवार यांंनी केली आहे.

महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ 'या' जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी

दुसरीकडे या मीटिंगविषयी प्रकाश जावडेकर यांंनी सुद्धा पुण्यात अँटीजेन चाचण्या वाढविल्या जातील असे आश्वासन दिले आहे. शहरात सीरो सर्वेक्षण करुन अ‍ॅन्टीबॉडीज असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी काम केले जाईल. याशिवाय मास्क बद्दलचे नियम कठोर करुन त्याचे पालन न करणार्‍यास 500 रुपये दंड केला जाईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांंना 1000 रुपये दंड आकारला जाईल. असेही जावडेकर यांंनी म्हंंटले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, पुण्यात सध्या 55023 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 4333 जणांंचा आजवर मृत्यु झाला आहे. पुण्यात आजवर 10366 जणांंनी कोरोनावर मात केली आहे. तर आजवर आढळलेल्या एकुण बाधितांंचा आकडा 189722 इतका आहे.