महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर गोंदिया, नागपूर येथे कोरोना व्हायरसचे नवे 5 रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रात एकूण 135 जणांचा त्याचे संक्रमण झाले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनची परिस्थितीत कायम असल्यामुळे नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास परवानगी नकाराण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील बहुतांश ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे आज मानखुर्द येथील परिसरात कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून निर्जतुंकीकरण करण्यात येत आहे.
राज्यात आलेल्या महासंकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी सरकारचे नियम पाळावेत असे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवू नये. मात्र लॉकडाउनच्या परिस्थितीत मानखुर्द येथे अग्निशमन दलाकडून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तर जीव धोक्यात काम करणाऱ्यांचे कौतुक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आले. तसेच राज्यातील 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.(Coronavirus in Maharashtra: डोंबिवली येथील 25 वर्षीय तरुण COVID-19 पॉझिटिव्ह; तुर्कीहून परतल्यावर हजारो पाहुण्यांची उपस्थिती असलेल्या विवाहसोहळ्याला लावली हजेरी)
Maharashtra: Roads in Mumbai's Mankhurd area being sanitised by Fire Brigade Department #COVID19 pic.twitter.com/bydhP8TgUZ
— ANI (@ANI) March 27, 2020
नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियम मोडू नये असे राजेश टोपे म्हटले आहे. एन 95 मास्क हे फक्त डॉक्टरांसाठीच असून पीपीई मास्कच्या उत्पादनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच खासगी डॉक्टरांनी कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी दवाखाने बंद करु नये असे ही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकत्रित येऊन कोरोना व्हायरसवर मात करु असे हा विश्वास राजेश टोपे यांनी दर्शवला आहे.