Coronavirus: झोपडपट्टी परिसर नसलेल्या भागात सुद्धा आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामध्ये महापालिकेचा आर-नॉर्थ म्हणजेच बोरिवली आणि दहीसरच्या भागाचा समावेश असून येथे रहिवाशी इमारती, कर्मचाऱ्यांसह सिक्युरिटी गार्ड यांच्या संदर्भातील नव्या गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. कोरोनापासून बचाव करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.(Mumbai Night Curfew: मुंबईत नाईट कर्फ्यू बद्दल पुढील 48 तासात निर्णय घेतला जाणार, फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार- महापौर किशोरी पेडणेकर)
गाईडलाइन्स जाहीर केल्यानंतर वैद्यकिय अधिकारी डॉ. अविनाश वायडांडे यांनी रविवारी वेबिनारच्या माध्यमातून असे म्हटले की, नागरिकांनी एकत्रित जमणे टाळा. जसे जीम, स्विमिंग पूलच्या ठिकाणी गर्दी करु नका आणि कोविडच्या नियमांचे पालन करा. त्याचसोबत सिक्युरिटी गार्ड, डोमेस्टिक हेल्पर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांनी नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात नेहमीच तपासणी करुन घ्यावी असे ही वायडांडे यांनी म्हटले आहे.
आर-नॉर्थ वॉर्डात कोरोनाच्या रुग्णांचा ग्रोथ रेट 0.31 टक्के असून शहराचा ग्रोथ रेट0.37 टक्के आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये रहिवाशी इमारतीत कठोरपणे नियमांचे पालन केले जात होते. मात्र आता याच नियमांकडे दुर्लक्ष नागरिकांकडून केले जात असल्याने आता पुन्हा गाईडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत नागरिकांना कोरोनाच्या लसीकरण केंद्राबद्दल सुद्धा वेबिनारच्या वेळी माहिती दिल्याचे वायडांडे सांगितले आहे.(COVID 19 : क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन, बॉलिवूड अभिनेत्याविरुद्ध गुन्हा; मुंबई पोलिसांची कारवाई)
दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी महापालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांनी कोरोनाच्या नियमांबद्दल ज्या पद्धतीने नागरिकांना मार्गदर्शन दिले जात आहे त्यावर ही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असली तरीही आजूबाजूला असलेल्या नागरिकांपासून आपला बचाव करण्यासाठी सेफ्टी प्रोटोकॉल्स बाळगणे सुद्धा आवश्यक असल्याचे घोसाळकर यांनी म्हटले आहे.