Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर वांद्रे पश्चिम विभागात नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला खरेदी करता येणार, पहा वेळापत्रक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

देशात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर दिले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहाणार आहे. तसेच राज्यात मुबलक प्रमाणात अत्यावश्यक सुविधांची साठा असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबईतील विविध ठिकाणी नागरिकांना भाजीपाला किंवा अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदारांकडून एक विशिष्ट वेळ ठरवून दिली आहे. याच पार्श्वभुमीवर वांद्रे पश्चिम येथील विभागात नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी वेळापत्रक जाहिर करण्याच आले आहे.

भाजप आमदार अशिष शेलार यांनी ट्वीट करत त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात स्वस्त दरात भाजी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर वेळापत्रकानुसार नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी व्हॅन विभागात उपलब्ध असणार असल्याचे ही म्हटले आहे. तर पहा नागरिकांना कधी स्वस्त दरात भाजी खरेदी करता येणार असल्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:(Coronavirus in Maharashtra: राज्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा 196 वर, जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर सह अन्य जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या)

तर कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फेव्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी करण्यात आला आहे. +912026127394 या नंबरवर नागरिक आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. यासंदर्भात BMC ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या या नंबरवर नागरिक कोरोना संदर्भातील कोणतीही माहिती विचारू शकतात. यासाठी नागरिकांनी या नंबरवर केवळ Hi असा संदेश पाठवायचा आहे. त्यानंतर नागरिक कोरोनासंदर्भातील आपले प्रश्न, शंका विचारू शकतात.