Coronavirus: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे (Public Health Department) व्हॉट्सअॅप नंबर (WhatsApp Number) जारी करण्यात आला आहे. +912026127394 या नंबरवर नागरिक आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. यासंदर्भात BMC ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. याशिवाय शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून BMC ने जारी केलेल्या नंबरची माहिती दिली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या या नंबरवर नागरिक कोरोना संदर्भातील कोणतीही माहिती विचारू शकतात. यासाठी नागरिकांनी या नंबरवर केवळ Hi असा संदेश पाठवायचा आहे. त्यानंतर नागरिक कोरोनासंदर्भातील आपले प्रश्न, शंका विचारू शकतात. तसेच येथे नागरिकांना राज्यातील कोरोना संदर्भातील माहितीही मिळेल, असंही मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: राज्यात कोरोनाचा 8 वा बळी; बुलढाण्यात 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू)
Say Hi to this WhatsApp number!
+912026127394
And get response to your basic queries about Corona Virus https://t.co/kOVi4wMCNR
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 29, 2020
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासंदर्भातील शंका दूर करण्यासाठी महाराष्ट्रात हेल्पलाईन नंबरची सुविधा सुरू केली होती. कोरोना व्हायरस संदर्भातील शंकांचं निरसन करण्यासाठी ठाकरे यांनी +91 2026127394 या व्हॉटस्अॅप चॅटबॉट नंबरची घोषणा केली होती. आज पुन्हा एकदा BMC ने नागरिकांच्या कोरोना संदर्भातील शंका दूर करण्यासाठी व्हॉटस्अॅप नंबरची घोषणा केली आहे.