Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) हा विषाणू गेले कित्येक दिवस महाराष्ट्रात ठाण मांडून बसला आहे. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली असूनही कोरोना ग्रस्तांचा आकडा मात्र वाढतच चालला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 196 वर जाऊन पोहोचला आहे. ही खूपच धक्कादायक बाब असून या विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिली तर राज्यातील परिस्थिती खूप गंभीर बनेल अशी चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या 196 पैकी 107 रुग्ण हे मुंबई आणि ठाणे (Mumbai and Thane) जिल्ह्यातील आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती थोडी चिंताजनक झाली आहे हे यावरुन स्पष्ट होतय.

राज्यात आतापर्यंत 7 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 196 राज्यातील रुग्णांची संख्या पाहता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून 107, पुणे-37, नागपूर-13, अहमदनगर- 03, रत्नागिरी- 01, औरंगाबाद- 01, यवतमाळ-03, मिरज-25, सातारा-02, सिंधुदुर्ग- 01, कोल्हापूर- 01, जळगाव- 01, बुलढाणा- 01 कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. Coronavirus: इटली येथे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर पोहचला-AFP यांची माहिती

 ANI चे ट्विट:

हेदेखील वाचा- Coronavirus: अमेरिकेत एका दिवसात कोरोनाबाधित 19 हजार नवे रुग्ण, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लॉकडाउनला विरोध

या आकडेवारीवरून कोरोना हा विषाणू ब-यापैकी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हळूहळू पसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहत नागरिकांनी या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा असेही आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती आकडेवारी समोर आली आहे. तर भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 918 वर पोहचला आहे. तर 80 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 19 जणांचा आतापर्यंत देशात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.