अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना संक्रमणाची संख्या 1,23,000 पेक्षा अधिक झाली आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे 2 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट येथे लॉकडाउन करण्यात येणार नसल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी लॉकडाउनची घोषणा केली होती पण शनिवारी रात्री ट्वीट करत त्यांचा निर्णय मागे घेतला. तर अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 19 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.
ट्रम्प यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, प्रवासी सल्ला देणे हा एक चांगला तोडगा आहे. पण न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुमो यांनी ट्रम्प यांनी राज्य सीमारेषा सील करण्याच्या टीकेला बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ट्रॅव्हल अॅडव्हायझरीत या तीन राज्यांतील रहिवाशांना असे आवाहन करण्यात आले आहे की, येत्या दोन आठवड्यांपर्यंत कोणत्याही प्रकारची यात्रा करणे आवश्यक नसेल तर कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळावा. दरम्यान, कुयोमोने यांनी न्यूयॉर्क येथे होणाऱ्या निवडणूका एप्रिल ऐवजी जून मध्ये होणार असल्याचे म्हटले आहे.(Coronavirus: स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा चा कोरोनामुळे मृत्यू)
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून सध्या अमेरिकेत शनिवारी याचा संक्रमणामुळे मृतांचा आकडा अधिक वाढला आहे. फक्त 24 तासात अमेरिकेत 525 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक महारोगाचे संकट सर्वत्र पसरल्याने येथे आतापर्यंत 2 हजारापेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत तीन दिवसांत मृतांचा आकडा दुप्पटीने वाढत असल्याचे समोर आले आहे.