चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात आपले थैमान घातले आहे. तर दिवसेंदिवस जगभरात कोरोनाबाधितांचा आकड्यासह मृतांची आकडेवारी ही वाढत चालली आहे. प्रत्येक देशाच्या स्थानिक सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस निर्णय आणि पावले उचचली जात आहेत. तर चीनमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र आता कोरोनाचे संकट आता इटलीसह अन्य देशांवर आले आहे. चीननंतर इटली येथे कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ताज्या अपडेटनुसार इटलीत कोरोना व्हायरसमुळे आकडा 10 हजारावर पोहचल्याची माहिती समोर आली आहे.
एएनआय यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, इटलीतील कोरोना व्हायरसचा आकडा 10 हजारावर पोहला आहे. याबाबत अधिक माहिती AFP यांनी दिली आहे. यापूर्वी कोरोनामुळे इटलीत गेल्या 24 तासात जवळपास 1000 नागरिकांचा बळी गेला. इटलीत गेल्या आठवड्यात मृतांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर आली होती. पण शुक्रवारी इटलीत 919 नागरिकांना आपला जीव गमावला आहे. तर, 26 हजार 350 लोकांना याची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.(Coronavirus: इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोना विषाणूची लागण; सेल्फ आयसोलेशनमध्येही करणार काम Video)
Italy's coronavirus toll tops 10,000, official says: AFP
— ANI (@ANI) March 28, 2020
ःःः
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती आकडेवारी समोर आली आहे. तर भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 918 वर पोहचला आहे. तर 80 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 19 जणांचा आतापर्यंत देशात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.