Coronavirus In Maharashtra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Covid 19 patients: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात आज (1 मे 2020) दिवसभरात कोरना व्हायरस (COVID-19) संक्रमित 1008 नवे रुग्ण आढळले. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा 11,506 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 485 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातीलही कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांसी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या शेवटच्या अद्यवावत माहितीनुसार गेल्या 24 तासात देशभरात तब्बल 1755 नवे रुग्ण सापडले आहेत. तर, 77 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 35365 इतकी झाली आहे. यात उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आलेल्या 9064 जणांचाही समावेश आहे. तसेच देशभरातील कोरना संक्रमित एकूण 1152 मृतांचाही या आकडेवारीत समावेश आहे. (हेही वाचा, Lockdown: लॉकडाऊन कालावधी 2 आठवड्यांनी वाढविण्यात आला, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

पीटीआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातील नांदेडमधील हजूर साहिब येथून पंजाबला परत आलेल्या 137 नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमण झाल्याची माहिती पंजाबच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. नांदेड येथे असलेल्या गुरुद्वाराला भेट देण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या प्रमाणावर दोन्ही राज्यांमध्ये येजा करत असतात. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मे रोजी पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत असताना त्यात 3 मे पर्यंत वाढविण्यात आली. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधी आणखी 2 आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तीन मे रोजी संपत असलेला लॉकडाऊन आता 4 मे पासून 17 मे पर्यंत लागू राहणार आहे.