लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सर्व वाहतुकीच्या सेवा ठप्प असल्याने गावी पायी निघालेल्या मजूरांचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबई (Mumbai) मधील पालघर (Palghar) येथे हा अपघात झाला असून यात 4 मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व सेवा ठप्प झाल्याने मजूरांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला. मात्र मजूरांचा हा निर्णय त्यांच्या जीवावर बेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे भारत देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे, बस किंवा वाहतूकीच्या इतर सेवा ठप्प आहेत. त्यामुळे लॉकडाऊनने आधीच बेहाल झालेल्या मजूरांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. शहरात कोणताही आधार नसल्याने अनेकांनी गावची वाट धरली आहे. (कोल्हापूर: लॉक डाऊन च्या भीतीने गावाला जात असतानाच कुटुंबावर काळाचा घाला; 6 वर्षाच्या चिमुकल्यासोबत दांपत्याचा अपघाती मृत्यू)
ANI Tweet:
मुंबई,पालघर: देशभर में जारी लॉकडाउन के बीच अपने गांव पैदल जा रहे चार प्रवासी मजदूर एक सड़क दुर्घटना में मारे गए। दुर्घटना में तीन अन्य लोग घायल हो गए। अज्ञात व्यक्ति के खिलाफ़ मामला दर्ज़, छानबीन जारी। #CoronaLockdown pic.twitter.com/ok9HPE3kL2
— ANI_HindiNews (@AHindinews) March 28, 2020
लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या अनेक कामगारांनी आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी पर्याय निवडला आहे. दिल्ली, मुंबई सारखी शहरं सोडून मजूरांनी गावाचा रस्ता धरला आहे. पायपीट करत गावी जाणाऱ्या अनेकांचे फोटोज, व्हिडिओज समोर आले आहेत. दरम्यान तुम्ही आहात तिथेच रहा, कोणत्याही प्रकारचा प्रवास करु नका, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.