Coronavirus Lockdown मुळे बेरोजगार कामगारांची घराच्या दिशेने धाव; घर गाठण्यासाठी कुटुंबासह पायपीट (Watch Video)
Migrant workers leaving Delhi on foot for their homes in neighbouring states (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस संपूर्ण जगासह भारत देशाला विळखा घातला आहे. कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रभावामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण भारत देश 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या, कारखाने, व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे गरीब आणि रोजंदारी कामगारांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मुलभूत गरजांचा प्रश्न उभा राहिल्याने विविध राज्यातून आलेले अनेक कामगार, मजूर आपल्या घराकडे धाव घेत आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे ट्रेन, बस आणि इतर वाहतूकीच्या सुविधा बंद झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने असलेले या कामगारांनी पायीच आपल्या घराची वाट धरली आहे. पायपीट करत असलेल्या या कामगारांचे काही फोटोज, व्हिडिओज समोर आले आहेत. (Coronavirus in India: भारत देशात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 873; तर कोरोनाचे एकूण 19 बळी)

लॉकडाऊनमुळे दिल्लीतील रिक्षाचालक पंछु मंडल हे दिल्लीहून पश्चिम बंगाल येथील आपल्या घरी पायीच निघाले आहेत. मात्र त्यांना त्यांच्या घरी पोहचवण्यात येईल, असे सांगून पोलिसांना त्यांना परत पाठवले आहे. पश्चिम बंगालला आपल्या घरी जाण्यासाठी 7 दिवस लागतील असे पंछु यांचे म्हणणे आहे. येथे आम्हाला काहीच काम नाही.

ANI Tweet:

ANI Tweet:

बससाठी लोकांची गर्दी:

90 वर्षांच्या महिलेची दिल्ली ते राजस्थान येथील तिच्या घरापर्यंत पोहण्यासाठी पायपीट.

दिल्लीहून घरी परतणारे कामगार.

लॉकडाऊनमुळे पायीच घर गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना दिल्ली आणि उत्तर प्रदेश सीमेवर अडवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशला जाणाऱ्या लोकांना घरापर्यंत पोहचवण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.