Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

संपूर्ण जगाला ग्रासून टाकलेल्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) प्रस्थ आता भारत देशातही वाढू लागले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आता हा आकडा 873 वर पोहचला आहे. तर 19 कोरोनाग्रस्त रुग्णांचा यात बळी गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. त्यापैकी 79 रुग्ण यशस्वी उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून काहींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही काहीजण वैद्यकीय निगराणीखाली आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत देशात तब्बल 775 रुग्ण कोरोना बाधित आहेत. कोरोना बाधितांसाठी डॉक्टर्से, नर्सेस सह इतर कर्चमारी वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे 79 रुग्णांना पूर्णपणे बरे करणे शक्य झाले आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वाढू नये म्हणून शासनाने वेळीच पाऊल उचलत देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसंच सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. लॉकडाऊनला नागरिकही चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र हळूहळू पाहायला मिळत आहे. (कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी भारतीय सेना तयार, 'ऑपरेशन नमस्ते' ची घोषणा)

ANI Tweet:

<

कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या नागरिकांची चिंता वाढवत आहे. मात्र घाबरुन न जाता काळजी घेण्याचं आवाहन सर्वच माध्यमातून करण्यात येत आहे. 'बनो कोरोना वॉरियर्स' असा संदेश देणारा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा असल्यास सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.