पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला 'बनो कोरोना वॉरियर्स' असा संदेश देणारा चिमुकलीचा खास व्हिडिओ (Watch Video)
A young girl’s message Video shared by Pm Modi (Photo Credits: Twitter/PTI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव भारत देशात वाढत चालला आहे. कोरोनाने देशात महाभयंकर रुप धारण करु नये म्हणून खबरदारी म्हणून देश लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. तसंच घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन सरकारकडून सातत्याने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खास संदेश देशवासियांना दिला आहे. यासाठी मोदींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. बनो कोरोना वॉरियर्स असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी आपल्या वडीलांना पत्र लिहिताना दिसत आहे. वडील कामानिमित्त दुसरीकडे अडकल्याने त्यांना घराबाहेर पडू नका आणि कोरोनापासून सुरक्षित रहा, असा संदेश ती पत्रातून आपल्या वडिलांना देत आहे.

ती मुलगी पत्रात लिहिते की, मी आणि आई तुम्हाला मीस करत नाही. त्यामुळे मुंबईहून धावपळ करत घरी येण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच रहा. तुम्ही बाहेर पडलात तर कोरोना जिंकेल. आणि आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे. त्यामुळे या व्हिडिओतील मुलीप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या पालकांची काळजी घ्या आणि कोरोना वॉरियर्स बना असा संदेश यातून देण्यात आला आहे. (G20 Virtual Summit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी- 20 देशांतील नेत्यांना केले संबोधित; मानवी जीवनावर लक्ष केंद्रीत करण्याची केली विनंती)

नरेंद्र मोदी यांची पोस्ट:

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे 14 एप्रिलपर्यंत देश लॉकडाऊन राहणार आहे. या काळात सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपण कोरोना विरुद्धची लढाई जिंकू शकतो, असा विश्वास देशवासियांच्या मनात निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे.