कोरोना विषाणूने संपूर्ण हाहाकार माजवला असून याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज जी-20 (G20 Virtual Summit) देशांमध्ये महत्वाची चर्चा पार पडली. दरम्यान, एनएसए अजीत डोभाल आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील उपस्थित होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) जी-20 देशातील नेत्यांनी संबोधित करत मानवी जीवनावर लक्ष केंद्रीत करण्याची विनंत केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर समाजातील कमजोर लोकांची अडचणी कमी करण्याची योजना बनवली पाहीजे, अशीही विनंती नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी केली. सध्या एकून 172 देश कोरोना विषाणूशी लढा देत आहेत. कोरोना विषाणूचे लागण होऊन आता पर्यंत 16 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाख 38 हजार लोक कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
साऊदी अरब येथे गुरूवारी जी-20 दोशांची आपतकालीन शिखर सम्मेलन सुरु झाले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा भारतीय पंतप्रधान यांनी या सम्मेलनात सहभाग घेतला. संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट वावरत आहे. यासंदर्भात देशातील मोठ मोठ्या नेत्यांनी याविषयावर चर्चा केली. तसेच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठीही चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटावर भाष्य करत म्हणाले की, जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. नरेंद्र मोदी यांनी जी- 20 देशांतील नेत्यांना केले संबोधित करत मानवी जीवनावर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले कोरोना व्हायरस विरोधात केंद्र सरकारचे विशेष पॅकेज; कर्मचारी, महिला, शेतकरी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मदत
एएनआयचे ट्वीट-
Prime Minister Narendra Modi today addressed other G20 leaders during the #G20VirtualSummit on coordinated global response to the #COVID19 pandemic & its human & economic implications. NSA Ajit Doval & External Affairs Minister S Jaishankar were also present. pic.twitter.com/QEbE53AvY6
— ANI (@ANI) March 26, 2020
भारतात आतापर्यंत 694 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 43 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 130 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.