Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus In Pune: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर विविध ठिकाणी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यासह संचार बंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. अशातच आता पुण्यात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. कारण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोनाचे पुण्यात 1300 रुग्ण होते. परंतु या एकाच महिन्यात त्याचा आकडा 7 हजारांवर पोहचला असून ती एक चिंतेची बाब असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.(Coronavirus In Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाल्याने 'हे' निर्बंध लागू)

मुरलीधर मोहोळ यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, टेस्टिंग आणि स्वॅब कलेक्शन केंद्राची संख्या पुण्यात वाढवण्यात येणार आहे. मात्र कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनन करण्याचा कोणताच विचार केलेला नाही. परंतु अधिक सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध घालण्यात येतील यावर चर्चा झाल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.(COVID-19 Cases in Maharashtra: सावधान! महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ, मागील 24 तासांत आढळले 13,659 नवे रुग्ण)

Tweet:

तर पुण्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या लोकांबद्दल खोटी माहिती देणाऱ्या तीन टेस्टिंग लॅबच्या विरोधात कारवाई करत ते सील करण्यात आले आहेत. त्यामध्ये मेट्रोपोलिसचा सुद्धा समावेश आहे. तपासात असे समोर आले आहे की, 30 टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध लावणे कठीण झाले.