महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (COVID-19 Cases in Maharashtra) हा विषाणू पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of Maharashtra) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मागील 24 तासांत 13,659 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 22 लाख 52 हजार 57 (COVID-19 Cases) वर पोहोचली असून मृतांचा आकडा 52,610 (COVID-19 Death Cases) वर पोहोचला आहे. याचाच अर्थ दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ही राज्यातील धोक्याची घंटा आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासांत 9913 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून एकूण 20 लाख 99 हजार 207 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला राज्यात एकूण 99 हजार 8 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईकरांनो नियमांचे पालन करा! आज शहरात कोरोनाच्या आणखी 1539 रुग्णांची भर पडल्याची BMC ची माहिती
Maharashtra reports 13,659 new #COVID19 cases, 9,913 discharges and 54 deaths in the last 24 hours.
Total cases: 22,52,057
Total recoveries 20,99,207
Death toll 52,610
Active cases 99,008 pic.twitter.com/GQV7tn8R4l
— ANI (@ANI) March 10, 2021
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी कोरोनाचे नियम अधिकाधिक कडक करण्यात आले आहे. तसेच अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही हे मुख्यमंत्र्यांनी जनतेवर सोडलेले आहे. मात्र जर स्थिती हाताबाहेर गेली तर राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रात सद्य घडीला 4,71,187 रुग्ण होम क्वारंटाईन असून 4,244 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 71 लाख 15 हजार 534 कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत.
दरम्यान मुंबईत आज कोरोनाचे आणखी 1539 रुग्ण आढळल्याची माहिती दिली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरात कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर पोहचला असून 9 मार्च पर्यंत 34,75,744 कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या आहेत.