Coronavirus (Photo Credits: IANS)

Coronavirus In Kalyan-Dombivali:  मुंबईसह आता कल्याण-डोंबिवलीत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तर आज कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे आणखी 392 रुग्णांची भर पडल्याने खळबळ उडाली आहे. जवळजवळ 5 महिन्यानंतर आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 300 च्या पार गेल्याचे दिसून आले आहे. याच कारणास्तव आता कल्याण-डोंबिवलीत काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.(Mumbai COVID-19 Vaccination: मुंबईतील खासगी केंद्रांवर 24x7 कोरोना लसीकरण होणार- BMC)

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहेच. पण नागरिकांनी सुद्धा नियमांचे पालन करणे आणि मास्क घालणे हे अत्यावश्यक आहे. मात्र काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत असल्याने आता निर्बंध लागू करण्याची वेळ आली आहे. तर जाणून घ्या कोणते निर्बंध घालण्यात आले आहेत.(Sambhaji Raje Chhatrapati यांनी घेतला COVID 19 लसीचा पहिला डोस; लस सुरक्षित असल्याचं सांगत नागरिकांनाही केले डोस घेण्याचं आवाहन)

-अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

-शनिवार आणि रविवारी पी1 पी2 नुसार दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

-हॉटेल्स, रेस्टॉरंट-बार रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.

-खाद्यपदार्थांसह हातागाड्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.

-पार्सल सेवा रात्री 10 पर्यंतच सुरु असणार आहे.

-भाजी मार्केट 50 टक्के सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे.

-लग्न, हळदी समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसणार आहे. त्याचसोबत नियमांचे जर त्यावेळी उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार आहे.

-रिक्षात 2 पेक्षा अधिक जण बसू शकत नाहीत.

-नागरिकांनी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

-महाशिवरात्री निमित्त सर्व मंदिरे बंद राहणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 13,659 रुग्ण आढळले असून 9913 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच गेल्या 24 तासात 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा 22,52,057 वर पोहचला असून आतापर्यंत 52,610 जणांचा बळी गेला आहे. अॅक्टिव्ह रुग्ण हे 99,008 असून 20,99,207 जणांनी कोरोनावर मात केली आहे.