मुंबईत कोरोना लसीकरण (Corona Vaccine in Mumbai) जलद गतीने व्हावे आणि अधिकाधिक लोकांना कोरोनाची लस दिली जावी यासाठी मुंबईतील खासगी केंद्रांवर 24X7 कोरोनाचे लसीकरण करता यावे असा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने (BMC) केंद्राला पाठविला होता. या प्रस्तावाला केंद्राने मंजूरी दिली असून आता मुंबईतील खासगी केंद्रांवर 24 तास कोरोनाचे लसीकरण दिले जाणार आहे अशी माहिती मुंबई मनपाने दिली आहे. हे लसीकरण सुलभ करण्यासाठी लसीकरण नोंदणी वेबसाइटवर आवश्यक ते बदल करावे अशी विनंती पालिकेने केंद्राला केली आहे.
ही मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून मुंबईत कोरोनाचे लसीकरण आणखी जलद गतीने होईल. खासगी केंद्रावर 24x7 लसीकरणाला मान्यता दिल्यानंतर रोज सुमारे 1 लाख लसीकरण करण्याचे मुंबई मनपाचे उद्दिष्ट्य आहे.हेदेखील वाचा- Mumbai: विमान प्रवासासाठी कोविडचे बनावट रिपोर्ट्स दाखवणाऱ्या परिवाराच्या विरोधात FIR दाखल
After Centre's approval for 24×7 vaccination at private centers, BMC aims for around 1 lakh vaccination every day. With current timing of 8-12 hour shifts for vaccination around 35,000-40,000 people are getting vaccinated every day: BMC#COVID19Vaccination
— ANI (@ANI) March 10, 2021
मुंबईत कोरोना लसीकरणासाठी रोज 8-12 तासांच्या शिफ्टमध्ये 35,000 ते 40,000 कर्मचा-यांना लसीकरण केले जात आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
मुंबईत काल दिवसभरात 0151 रुग्ण बरे झाले असून 9 मार्च संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3,12,458 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच कालपर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,35,584 वर पोहोचली आहे.
दरम्यान मुंबईत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे आता महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात आहेत. अशातच आता रहिवाशी इमारतीत 5 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यास ती सील केली जाणार आहे. तर 5 पेक्षा कमी रुग्ण आढळल्यास ज्या मजल्यावर रुग्ण आढळला आहे तोच मजला फक्त सील केला जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.