Mumbai: जयपूर येथे प्रवास करण्यासाठी एका परिवाराने कोरोनाचे खोटे रिपोर्ट्स तयार केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने संपूर्ण परिवाराच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर या सर्वांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले असून तरीही सुद्धा बनावट रिपोर्ट्स दाखवत त्यांनी विमानातून प्रवास केल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार या परिवाराच्या विरोधात विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Anandwan Corona's Hotspot: आनंदवन कोरोना हॉटस्पॉट, COVID 19 संक्रमितांची संख्या वाढल्याने बाहेरील लोकांना प्रवेश बंदी)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारीला या परिवाराला मुंबई ते जयपूर असा विमानाने प्रवास करायचा होता. मात्र प्रवासासाठी त्यांना कोरोनाचा रिपोर्ट्स दाखवणे अनिवार्य असल्याचे सध्या लागू करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी कोरोनाचे रिपोर्ट्स काढले असता ते पॉझिटिव्ह आले होते. परंतु ज्या दिवशी प्रवास करायच्या त्याआधी त्यांनी आपल्याला कोरोना झालाच नाही असे निगेटिव्ह रिपोर्ट्स दाखवले. परंतु त्यांनी ज्या केंद्रातून कोरोनाची चाचणी केली त्यांनी महापालिकेला त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्याचसोबत जेव्हा डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाइनच्या नियमांबद्दल सांगण्यास फोन केला असता त्यावेळी त्यांनी आमचे निगेटिव्ह रिपोर्ट्स आल्याचे त्यांना सांगितले.(Janta Curfew in Jalgaon: जळगाव मध्ये 11 ते 15 मार्च पर्यंत जनता कर्फ्यू; काय राहणार सुरु काय बंद? जाणून घ्या)
दरम्यान, राज्यात कोरोनाचे पुन्हा एकदा रुग्ण वाढत चालले असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्याचसोबत ज्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांना जर पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर मास्क घालण्यासह नियमांचे पालन करावे असे स्पष्ट केले होते. त्याचसोबत मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा सध्या सामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकलमुळे काही प्रमाणात वाढत असल्याचे बोलले जात आहे.