Janta Curfew in Jalgaon: जळगाव मध्ये 11 ते 15 मार्च पर्यंत जनता कर्फ्यू; काय राहणार सुरु काय बंद? जाणून घ्या
Curfew | Representational Image (Photo Credits: ANI)

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा गेल्या काही दिवासंपासून सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात निर्बंध लादण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जळगाव (Jalgaon) मध्ये तीन दिवसीय 'जनता कर्फ्यू'ची (Janta Curfew) घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे 11 ते 15 मार्च दरम्यान जळगावमध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Abhijit Raut) यांनी सांगितले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका आणि स्थानिक पोलिस जबाबदार असतील, असेही ते म्हणाले.

जळगाव शहरातील पालिका हद्दीत 11 मार्च रात्री 8 वाजल्यापासून 15 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे. जनतेने या कालावधीत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसंच जनता कर्फ्यूबाबत नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. (नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! नाशिक मध्ये 'या' तारखेनंतर लग्नसमारंभास परवानगी नाही, जाणून घ्या नवे कोरोनाचे नियम)

ANI Tweet: 

जनता कर्फ्यू दरम्यान काय सुरु राहणार, काय बंद? जाणून घेऊया...

काय सुरु राहणार?

# रेल्वे, बस, विमानसेवा, जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक

# टॅक्सी, कॅब, रिक्षा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरिता आणि परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु

# तसंच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहनांना मुभा

# औषधी दुकाने, रूग्णालयं, दूध खरेदी-विक्री केंद्र

# पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी सुरु

# शासकीय कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु

काय बंद राहणार?

# शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठ, शैक्षणिक संस्था

# हॉटेल, रेस्टॉरंट (होम डिलिव्हरी वगळता)

# किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी-विक्री केंद्रे, आठवडी बाजार.

# धार्मिक स्थळं

# सलून

# खासगी कार्यालयं

# उद्यानं, व्यामाशाळा, जलंतरण तलाव

# क्रिडा स्पर्धा

# सिनेमागृहं, नाट्यगृहं

# सभा, मेळावे

# शासकीय, खासगी बांधकामं

# शॉपिंग मॉल्स

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर विभागाच्या परीक्षांना यातून सूट देण्यात आली आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.