राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus In Maharashtra) रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात येत्या 28 मार्च पासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew In Maharashtra) लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकण्याबाबात आणि कडक निर्बंध लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
देशातील राज्यांमध्ये असेलील कोरोना रुग्णांची एकूण संख्या पाहता त्यात महाराष्ट्र अव्वल आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. इतकेच नव्हे तर देशभरातील कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक अॅक्टीव्ह असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Lockdown In Parbhani: चिंताजनक! परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनला नागरिकांचा विरोध; दंडात्मक कारवाईलाही सामोरे जाण्याची दाखवली तयारी)
#CORRECTION | Night curfew to be imposed in Maharashtra from the night of 28th March. A separate order in this regard will be issued by the Disaster management and rehabilitation department soon: Maharashtra's Chief Minister Office pic.twitter.com/wq4cUTgZrs
— ANI (@ANI) March 26, 2021
महाराष्ट्रात अॅक्टीव्ह रुग्णसंख्या असलेले जिल्हे
- पुणे
- नागपूर
- मुंबई
- ठाणे
- नाशिक
- औरंगाबाद
- नांदेड
- जळगाव
- अकोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज पार पडलेल्या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आणि राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते असे समजते.