Coronavirus: सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 63 कैद्यांना संसर्ग
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेदिवस कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. यातच सांगली जिल्हा कारागृहातील (Sangli District Jail) तब्बल 63 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. सांगली कारागृहात मागील तीन दिवसांपूर्वी 50 वर्षावरील कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात 63 कैद्यांना कोरोनाची संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहेत. ज्यामुळे पोलीस प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचचली जात आहे.

सांगली जिल्ह्यात एकूण 320 कैदी आहेत. सांगली कारागृहातील 50 वर्षांच्यावरील बंदिवान आणि कर्मचारी यांची रॅपिड टेस्ट घेतली होती. या चाचणीचा अहवाल रविवारी आला. त्यावेली कारागृहातील 63 कैद्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधित सर्व कैद्यांना कारागृहात क्वारंटाइन केले जात आहे. तसेच 50 वर्षांवरील कैद्यांना अन्यत्र ठेवण्यात येत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची लागण

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे. तर, 1 हजार 641 रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. रविवारी एका दिवसात 268 रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत.