Coronavirus: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची लागण
Navneet Kaur Rana (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूच्या जाळे दिवसेंदिवस मोठ्या वेगाने संपूर्ण महाराष्ट्रात पसरत चालले आहे. दरम्यान, सर्वसामन्यांपासून अनेक राजकीय नेते आणि कलाकार कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत कौर (MP Navneet Kaur Rana's Family members tested COVID19 Positive) यांच्या कुटुंबियातील तब्बल सात जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांना रविवारी दुपारी कोरोनाचा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले, कुटुंबियातील सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर अनेकांना बरोजगारीचा सामना करावा लागला होता. अशा लोकांना मदतीसाठी रवी राणा यांनी धान्य वाटप करण्यासाठी दौरे केले होते. त्यावेळी त्यांना 103-104 सेल्सीअस डीग्री ताप आला होता. तसेच त्यांना शरिरभर असह्य वेदना जाणवू लागल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला होता. नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. हे देखील वाचा- पुणे: चाकण मधील कंपनीत एकाच वेळी 76 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात रविवारी संध्याकाळपर्यंत आणखी 9 हजार 509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 260 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 41 हजार 228 वर पोहचली आहे. यापैंकी 15 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.