पुणे: चाकण मधील कंपनीत एकाच वेळी 76 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

पुणे (Pune) जिल्ह्यातील चाकण (Chakan)  भागातील एका कंपनीच्या किमान 76 कामगारांची कोरोना व्हायरस चे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) आल्याचे समजत आहे. याबाबत पुणे जिल्ह्यात कार्यरत एका आरोग्य अधिकार्‍याने माहिती देत सांगितले की,काही दिवसांपुर्वी कंपनीने चाचणीसाठी सुमारे 900 कर्मचार्‍यांचे स्वॅप नमुने पाठवले होते, शनिवारी याचे रिपोर्ट्स समोर येताच तब्बल 76 कर्मचारी हे कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. कंंपनीचे नाव उघड करण्यास आरोग्य अधिकार्‍यांनी नकार दिला आहे मात्र या अहवालानंतर खेडचे तहसील आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गडावे यांनी शनिवारी कंपनीला भेट दिली व आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

ठाणे: बिल्डिंग बांधकाम करणाऱ्या 86 कामगारांना एकाच वेळी कोरोनाची लागण

जिल्हा प्रशासनाने सध्या कंटमेंट झोनमध्ये राहणार्‍या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम चा पर्याय वापरण्यास द्यावा अशा सुचना चाकण एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना दिल्या आहेत.तसेच जे कर्मचारी ऑफिस मध्ये येउन काम करतील त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा कंपनीची आहे, त्यामुळे कार्यक्षेत्रात सॅनिटायजेशन करण्यापासुन ते कर्मचार्‍यांच्या आरोग्य तपासणी पर्यंत सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनलॉक अंतर्गत आता पुन्हा खाजगी ऑफिस सुरु होत असताना आरोग्याबाबत हलगर्जी केल्यास कोरोना आणखीन बळावु शकतो असा इशारा शासनाने वेळोवेळी दिला आहे.

PTI ट्विट

धक्कादायक! पुणे येथील हडपसर परिसरातील सह्याद्री रुग्णालयात वॉर्डबॉयकडून एका कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग

दरम्यान पुण्यात आजवर कोरोनाचे 28,142 रुग्ण आढळले आहेत, यापैकी 13,406 रुग्ण बरे झाले असुन 872 जणांचा आजवर मृत्यु झाला आहे. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांंनी खाजगी रुग्णालयातुन कोरोना मृतांची प्रकरणे लपवली जात असल्याचा आरोप लगावला आहे. शहरातील ससून जनरल हॉस्पिटल व शहरातील इतर खासगी रुग्णालयात दरमहा किमान 400 ते 500 संशयित कोरोना विषाणूचे रुग्ण मरण पावत आहेत, मात्र त्यांचा हिशेब ठेवला जात नाही असे मोहोळ यांनी म्हंटले आहे.