ठाणे: बिल्डिंग बांधकाम करणाऱ्या 86 कामगारांना एकाच वेळी कोरोनाची लागण
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

ठाणे (Thane) येथील मानपाडा (Manpada)- माजिवडा (Majiwada) भागात एका प्रख्यात बिल्डरच्या प्रोजेक्ट अंतर्गत बांधकाम करणाऱ्या 86 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. ठाणे महापालिका उपायुक्त संदीप मालवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोजेक्ट मध्ये काम करणार्‍या 536 कामगारांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती ज्यात 86 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या कामगारांना त्वरित क्वारंटाईन करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती सध्या स्वस्थ आहे. मात्र हा चिंंतेचा विषय ठरु शकतो कारण अनलॉकच्या नियमांनुसार,जरी बांंधकाम संबधित कामांंना परवानगी दिली असली तरी याठिकाणी पुरेपुर काळजी घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा बाधित रुग्ण सुद्धा काम करत असल्यास कोरोना आणखीन बळावण्याचा धोका टाळता येत नाही. Coronavirus Update in Maharashtra: मुंबई, पुणे, सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधील COVID-19 रुग्णांची एकूण संख्या; जाणून घ्या एका क्लिकवर

मागील आठवड्यात ठाणे महापालिका आयुक्त,डॉ.विपिन शर्मा यांनी बांधकाम सुरु असणार्‍या ठिकाणी तसेच छोट्या उद्योगांच्या ठिकाणी RTPCR चाचण्या घेण्यासाठी सक्ती केली होती. सध्या प्रत्येक साईटवर 200 कर्मचार्‍यांना एकाच वेळी काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. Coronavirus Lockdown in Thane: ठाणे जिल्ह्यामध्ये कंटेन्मेंट झोन साठी लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्यंत कायम!

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. सध्याची आकडेवारी पाहिल्यास ठाण्यात कोरोनाचे एकुण 85256 पर्यंत रूग्ण आहेत. याच पार्श्वभुमीवर ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन सुरु ठेवण्यात येणार आहे.