प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून आतापर्यंत राज्यात 4 लाख 22 हजार 118 कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) रुग्ण आढळले आहेत. राज्यात काल (31 जुलै) दिवसभरात 10 हजार 320 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 265 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 14,994 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, कोविड योद्धा (COVID Warriors) सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत असून त्यापाठोपाठ ठाणे,पुणे,पालघरमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 14 हजार 278 वर पोहचली आहे. यापैकी 6 हजार 350 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus In Mumbai Today Case: मुंबईत आज 1 हजार 100 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 53 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (31 जुलै रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Maharashtra COVID-19 Patients (Photo Credits: File)
Maharashtra COVID-19 Patients (Photo Credits: File)

तर देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 38 हजार 871 इतकी झाली आहे. देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 35 हजार 747 इतकी झाली आहे. धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे यातील 18 हजार रुग्णांचा मृत्यु जुलै महिन्यात झाला आहे.