मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत आज आणखी 1 हजार 100 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 53 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 14 हजार 278 वर पोहचली आहे. यापैंकी 6 हजार 350 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2556 वर पोहचला, महापालिकेची माहिती
मुंबई महानगरपालिकेचे ट्वीट-
31-July; 6:00pm
Discharged Pts. (24 hrs) - 689
Total Recovered Pts. - 87,074
Overall Recovery Rate - 76%
Total Active Pts. - 20,569
Doubling Rate - 76 Days
Growth Rate (24-30 July) - 0.92%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 31, 2020
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.