मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मान (Spinal Pain) आणि पाठीच्या स्नायूंच्या (Back Pain) दुखापतीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. पाठीमागील एक आठवड्यापासून त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांनी आपली नियमीत वैद्यकीय तपासणीही करुण घेतल्याचे सांगण्यात येते आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही. आज (8 नोव्हेंबर) पंढरपूर वारी पालखी मार्ग शुभारंभ (Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration) कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेला पट्टा लावून भाषण करताना दिसले. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या प्रकृतिबाबत विचारणा सुरु झाली. त्यानंतर त्यांच्या पाठीच्या दुखण्याबाबत प्रसारमाध्यमांतून वृत्त आले.
दरम्यान, पंढरपूर येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रास्ताविक भाषण केले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना 'प्रकृती बरी नसतानाही मुख्यमंत्री या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले' असा उल्लेख केला. गडकरी यांच्या या माहितीमुळे उपस्थितांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेला पट्टा लावून भाषण करताना दिसले. (हेही वाचा, Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration: वारीच्या भक्तीमार्गाने देशाची वाटचाल सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
ट्विट
Laying of Foundation Stone of 13 Highway Projects at Pandharpur - LIVE https://t.co/xc7rgx1Zle
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 8, 2021
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील गिरगाव परिसरातील सर एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे आपली नियमीत आरोग्य तपासणी करुण घेतली होती. या वेळी त्यांच्या काही शारीरिक चाचण्याही करण्यात आल्या होत्या. पाठिमागी काही काळापासून ठाकरे यांना शारीरिक त्रास जाणवत होता. त्यामुळे दिवाळीत होणाऱ्या भेटीगाठीही त्यांनी टाळल्या होत्या. काही काळ वाट पाहूनही हात्रास कमी न झाल्याने ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.