CM Letter to Governor: देवेंद्र फडणवीस यांच्या मागण्या मांडणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं उत्तर
CM Uddhav Thackeray And Governor Bhagat Singh Koshyari (Photo Credits: Facebook)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या तीन मागण्यांचा उल्लेख केला होता. तसंच त्याबाबत निर्णय घेऊन कळवावे, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रातून उत्तर दिले आहे. पत्रात त्यांनी राज्यपालांनी उल्लेख केलेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणूक, विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी या तिन्ही मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

विधानसभा अध्यक्ष निवडणूक:

निवडणुकी न झाल्याने घटनात्मक तरतुदींचा कोणताही भंग झालेला नाही. कोरोनाची परिस्थिती पाहून आणि खबरदारी घेऊन निवडणूका पार पाडू.

विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी:

केंद्राचे निर्देश आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै असे दोन दिवसांचंच घेण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णत: ओसरलेली नसून तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे, त्यामुळेच विचार करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

ओबीसी आरक्षण:

राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर केली आहे. मात्र ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यसााठी घटनात्मक मार्ग काढण्याची विनंती पंतप्रधानांची भेट घेऊन आम्ही केली आहे. आपणही त्याचा पाठपुरावा करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पत्रात केली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari Letter: विधानसभा अध्यक्ष कधी नेमणार?राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे महाविकासआघाडी सरकारला पत्र)

दरम्यान,  23 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. त्यात माझ्यासमोर दोन निवेदनं सादर करण्यात आली. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणूक, विधीमंडळ अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवणे आणि ओबीसी आरक्षणामुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकला, अशा तीन मागण्या केल्या आहेत. हे तिन्हीही विषय महत्त्वाचे असल्याने त्यावर योग्य कारवाई करुन मला कळवा, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.