CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

Gadchiroli Naxal Attack: गडचिरोली (Gadchiroli) येथील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहिद झालेल्या 15 जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काल श्रद्धांजली वाहिली. यावेळी आपण या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे म्हणत त्यांच्यासाठी 1 कोटींचा मदतनिधी तयार करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची तातडीची मदत व नोकरीचा कालावधी पूर्ण होईपर्यंतचे पूर्ण वेतन देण्यात येईल असेही त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कॅडरनुसार घर देऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही जबाबदारी सरकार घेईल, असे मुनगंटीवर यांनी सांगितले.

जांभूरखेडा येथे सी-60 हे पथक खासगी वाहनाने जात असताना काही नक्षलवादींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवान शहीद झाले.हल्ल्याच्या आधी  मध्यरात्रीपासूनच नक्षलींनी गडचिरोलीतील कुरखेडा भागीतील रस्त्याच्या कामावरील तब्बल 27 वाहनं पेटवून देत हल्ल्याला सुरुवात केली होती. कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल वाहने, यंत्रसामग्री आणि कार्यालये पेटून दिली. यात दोन जेसीबी, 11 टिप्पर, डिझेल आणि पेट्रोल टँकर्स, रोलर्स, जेनरेटर व्हॅन यांचा समावेश होता.  नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांच्या कडून गडचिरोली येथील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध

या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात खासगी वाहन चालक तोमेश्वर भागवत सिंगनाथ यांचा ही मृत्यू झाला. या वाहन चालकाच्या कुटुंबाला देखील योग्य ती मदत करण्यात यावी यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले आहे. गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यानंतर शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, राजीनाम्याची मागणी

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे (National Human Rights Commission) या शहिदांच्या कुटुंबियांना योग्य ती भरपाई देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारचे हिंस्त्र हल्ले हे लोकशाहीला घातक आहे, या घटनेचा बळी पडलेल्या शहिदांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे, असे देखील NHRCने सांगितले आहे.