Gadchiroli Naxal Attack: गडचिरोलीमध्ये आज नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करत आइईडी (IED) हल्ला घडवला. महाराष्ट्र दिनी झालेल्या या भ्याड हल्ल्यानंतर आता राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज जांभूर खेडा येथील नक्षलवादी हल्ल्याचा निषेध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल करत राजीनाम्याची मागणी केली आहे. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांच्या कडून गडचिरोली येथील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध
शरद पवार यांचे ट्विट
गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 1, 2019
गडचिरोली येथील नक्षल वादी हल्ल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना त्यांनी 'राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.' असं म्हटले आहे.
गस्तीसाठी जाणार्या जवानांच्या दोन गाड्या नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाचं लक्ष्य ठरल्या. 25 जवान प्रवास करत होते. त्यापैकी 15 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि इतर जखमी आहेत. मृतांमध्ये 15 पोलिस आणि एका नागरिकाचा समावेश आहे. सध्याया परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
आज संध्याकाळी होणार्या सांस्कृतिक सोहळा आणि चहापानाचा राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.