
महाराष्ट्रातील लातूर (Latur) जिल्ह्यात शिवाजी जयंतीचे औचित्य साधून, मंगळवारी देशातील पहिले ग्रास पेंटिंग (Grass Painting) तयार करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील एका शेतामध्ये हे पेंटिंग बनवण्यात आले आहे. अक्का फाऊंडेशनच्या 2.5 लाख स्क्वेअर फीट शेतात शिवाजी महाराजांची ही भव्य पेंटिंग साकारली गेली आहे. मंगेश निपाणीकर (Mangesh Nipanikar) हा या पेंटिंगचा निर्मितीकार आहे. गेल्या वर्षी अरविंद पाटील निलंगेकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली होती. हे पाहून मंगेशने यावर्षी काही वेगळे करण्याचा निश्चय केला होता.
आपले हे गवतातील पेंटिंग साकारण्यासाठी, मंगेशने निळंगा शहरातील दाबका रोड यथे 6 एकर परिसरात गवत उगवण्यास सुरुवात केली. मंगळवारी जेव्हा हे गावात हिरवे झाले तेव्हा ही पेंटिंग साकारण्यात आली. कलाकार मंगेश निपाणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेंटिंगकरीता गवत उगवण्यासाठी जवळजवळ दीड हजार किलो बियाणे वापरला गेले. आकृतिचा आकार निश्चित करण्यासाठी एक आठवडाभर आधी बियाणांचे रोपण केले गेले होते. या पेंटिंगमध्ये थ्री डी इफेक्ट आणण्यासाठी त्यात ग्राफिंगही केले गेले. लोकांना हे पेंटिंग पाहण्यासाठी सेह्ताच्या चारही बाजूंना मोठ्या स्क्रीन लावले आहेत. (हेही वाचा: मोदी आंबा नंतर आता शाह आंबा; मँगो मॅन हाजी कलीमुल्लाह यांनी ठेवले आंब्याच्या नव्या प्रजातीचे नाव)
लातूरमध्ये गेल्या वर्षी शिवाजी जयंतीला देशातील सर्वात मोठी रांगोळी साकारली गेली होती. अडीच एकर परिसरात तयार झालेल्या या रांगोळीसाठी 50 हजार किलो रंगाचा वापर केला होता. 50 पेक्षा जास्त लोकांनी यात सहभाग नोंदवला होता, यामध्ये मंगेश निपाणीकर आणि अरविंद पाटीलही सामील होते. ही रांगोळी तयार होण्यास 72 पेक्षा तास लागले होते.आपण आपल्या गुगल नकाशा (Google Map) वर शिवाजी महाराजांचे हे पेंटिंग ठिकाण शोधू शकता. 'महाराज फार्मिंग पेंटिंग' या नावाने ते गुगल नकाशावर उपलब्ध आहे.