मोदी आंबा नंतर आता शाह आंबा; मँगो मॅन हाजी कलीमुल्लाह यांनी ठेवले आंब्याच्या नव्या प्रजातीचे नाव
Home Minister Amit Shah | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मँगो मॅन नावाने प्रसिद्ध असलेले आंबा उत्पादक हाजी कलीमुल्लाह (Haji Kalimullah) यांनी आंब्याच्या एका नव्या प्रजातीचे नाव चक्क केंद्रीय गृहतमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. कलीमुल्लाह यांनी सांगितले की, ते शाह यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावीत झाले. त्यांच्या मते शाह यांच्यात सामाजिक ताणेबाने निवळण्याचा आणि लोकांमध्ये एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची क्षमता आहे. हा आंबा आता शाह आंबा ( Shah Mango) नावाने ओळखला जाईल.

हाजी कलीमुल्लाह यांचनी शोधलेल्या आंब्याच्या प्रजातिचे नाव आहे शाह. या आंब्याचे वजन आणि चव दोन्ही चांगले आहे. हा आंबा आता 'शाह' ( Shah Mango) नावाने ओळखला जाईल. शाह आंबा तयार झाला आहे आणि येत्या काही दिवसात तो पिकायलाही लागेल. ज्यानंतर त्याला झाडावरुन उतरवले जाईल.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हाजी कलीमुल्ला यांनी 2015 मध्ये आंब्याच्या एका प्रजातीचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरुन ठेवले होते. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, 'माझी एक इच्छा आहे की, मी स्वत:च त्यांना फळांचा राजा पेश करावा. मला विश्वास आहे की, हे त्यांना नक्कीच आवडेन.' (हेही वाचा, आंबा खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी, असा ओळखा कोकणी हापूस)

मोदी आंबा हा सुद्धा चवीला छान आहे. दिसायलाही हा आंबा लक्षवेधी आहे. कलीमुल्लाह यांनी म्हटले आहे की, ज्यांनी हा आंबा खाल्ला आहे त्या सर्वांनीच या फळाचे कौतुक केले आहे. तसेच, या फळाच्या स्वादाचेही कौतुक केले आहे.

कलीमुल्लाह यांची लखनऊ जवळ मलीहाबाद येथे आंब्याची बाग आहे. कलीमुल्लाह यांनी या आधी तयार केलेल्या अंब्यांच्या प्रजातीला सचिन तेंडुलकर आणि ऐश्वर्या राय यांचीही नावे दिली आहेत.