राज्यातील राज्यसभेचा निकाल (Rajya Sabha Election Result 2022) जाहीर झाला असुन ही लढाई चांगली चुरशीची झाली. या निकालात महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार तर भाजपचे (BJP) तीन उमेदवार निवडून आले. भाजपने सहाव्या उमेदवारासाठी चांगलीच लढाई दिली. आपला सहवा उमेदवार निवडून भाजपने महाविकास आघाडीला चोख उत्तर दिलं. राज्यसभेच्या या झालेल्या निवडणूकीच भाजपने आपला आनंद व्यक्त करुन याच सगळ श्रेय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिल. भाजपच्या सहाव्या जागासाठी धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. राज्यसभेच्या निकालानंतर आता स्त्ताधारी आणि विरोधकाच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना छगण भुजबळ म्हणाले की संजय राऊत थोडक्यात वाचले, नाहीतर उलटे झाले असते. संजय राऊत निवडून येतील की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. नशीब म्हणुन संजय राऊत काठावर वाचले. नाही तर संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत पाठी राहिले असते. पण ऐनवेळी धोका टळला आणि संजय राऊत निवडून आले. आम्हाला अंदाज होता की महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडूण येतील पण असे झाले नाही. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. (हे देखील वाचा: Sanjay Raut Statement: घोडे-व्यापारात कोण सहभागी होते हे आम्ही लक्षात घेतले आहे, संजय राऊतांची प्रतिक्रिया)
फडणवीस अपक्षांना आपल्या बाजूने घेण्यात यशस्वी - शरद पवार
राज्यसभा निवडणुकीवर शरद पवार यांनी आपल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले हा चमत्कार घडला कारण भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी अपक्षांना आपल्या बाजूने घेण्यास यश मिळवले. ज्याने सर्व फरक पडला. परंतु, याचा महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.