Chandrakant Patil and Sharad Pawar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party ) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने पवार यांना पुरतं जेरीस आणलं. इतकं की, त्यांना बारामतीतच अडकवून ठेवत पिंगा घालायला लावला, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही पवार यांचे सर्व बालेकिल्ले उदध्वस्त केले. या निवडणुकीत पवार थोडक्यात वाचले, असं सांगतानाच शिवसेना - भाजप युती अभेद्य राहिल असेही चंद्रकांत पाटील असं सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.

हिंद केसरी मारुती माने (Maruti Mane) यांच्या पुतळ्याचे सांगली (Sangli) येथील कवठेपिरान (Kavathe Piran) येथे अनावरण करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीरदादा गाडगीळ , आदर्श सरपंच भीमराव माने आदी मंडळी उपस्थित होती.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपसमोर काँग्रेसपेक्षा क्रमांक एकचा शत्रू ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना बारामती या बालेकिल्ल्यातच खिंडीत गाठण्यासाठी चंद्रकांत पाटील आघाडीवर होते. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने कांचन कूल यांना उमेदवारी दिली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे या उमेदवार होत्या. सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत तळ ठोकला होता. (हेही वाचा, मुंबई: शरद पवार यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी)

दरम्यान, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यात भाजपला यश आले नाही. पण, या मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विजय होऊ शकतो, अशी उलटसुलट आणि काही अंशी वास्तववादी चर्चा सुरु करण्यात भाजपला यश आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात भाजपने दिलेल्या लढतीचीही चांगलीच चर्चा झाली.