Chandiwal Commission: चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर; अनिल देशमुख, परमबीर सिंह आरोप प्रकरण
Param Bir Singh,Anil Deshmukh | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रासह अवघ्य देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चांदीवाल आयोगाचा अहवाल अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर झाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणातील सत्यता शोधण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. अनेक साक्षी, पुरावे, जबाब नोंदवून चौकशी पूर्ण झाल्यावर हा अहवाल आयोगाने सरकारला सादर केला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेली गाडी आढळून आली. त्यानंतर या प्रकरणातील गुंतागुंत वाढत गेली. दरम्यान, परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन यांची तडकाफकी बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा खळबळजनक आरोप केला. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एक प्रकारे भुकंपच आला. एका झटक्यात महाविकासआघाडी सरकार बॅकफुटला गेले. त्यानंतर राज्य सरकारने चांदवाल आयोगाची स्थापना करुन या प्रकरणाची चौकशी केली. (हेही वाचा, Sachin Vaze on Anil Deshmukh: 'अनिल देशमुख यांनी कधीच वसुलीचे टार्गेट दिले नाही', सचिन वाझे यांच्या उत्तरामुळे 'कहानी में ट्विस्ट')

दरम्यान, राज्याचे गृहमत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला. अहवालात नेमके काय असू शकते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्य सरकार हा अहवाल कधी सार्वजनिक करणार याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत.