Central Railway Special Trains On Makar Sankranti 2020: मकरसंक्रांती निमित्ताने मध्य रेल्वे कडून चालवल्या जाणार 13-20 जानेवारी दरम्यान विशेष लोकल
Indian Railways | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेकडून यंदा पुण्यातून कोकणात जाणार्‍यांसाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. पुणे ते एर्नाकुलम दरम्यान यंदा हिवाळा आणि मकरासंक्रांतीचं औचित्य साधून प्रवास करणार्‍यांसाठी 13 जानेवारीपासून विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या 4 विकली स्पेशल ट्रेनचं बुकिंग ऑनलाईन माध्यमातून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर 8 जानेवारीपासून बुकिंग सुरू केले जाणार आहे. तर या विशेष ट्रेन 13 ते 20 जानेवारी दरम्यान चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेकडून सोलापूर-नागपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जाणार, जाणून घ्या वेळापत्रक

पुणे- एर्नाकुलम दरम्यान चालवली जाणारी 01469 पुणे- एर्नाकुलम Weekly Special ट्रेन चिंचवड, लोणावळा, पनवेल, रोह, खेड, चिपळून, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, या कोकणमार्गावरील स्थानकावर थांबणार आहे. तर या ट्रेनमध्ये AC 2 Tier चा एक, AC Tier 3 चे पाच, स्लिपर क्लास 8 आणि जनरल सेकंड क्लासचे 6 कोच आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या irctc.co.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्हांला तिकीटाचं बुकिंग करता येणार आहे. यंदा लीप इयर असल्याने मकरसंक्रात यंदा 15 जानेवारी दिवशी सेलिब्रेट केली जाणार आहे.