मध्य रेल्वेकडून सोलापूर-नागपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जाणार, जाणून घ्या वेळापत्रक
Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

मध्य रेल्वेकडून हिवाळ्यात आणि होळी सण लक्षात घेता प्रवाशांच्या प्रवासासाठी सोलापूर-नागपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालवणार आहेत. गाडी क्रमांक 0211 सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी 19 जानेवारी ते 29 मार्च 2020 पर्यंत धावणार आहे. त्यानुसार प्रत्येक रविवारी 8.00 वाजता सोलापूर येथून सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी 1.30 मिनिटांनी नागपूर येथे पोहचणार आहे. तसेच गाडी क्रमांक 02112 ही 20 मार्च ते 30 मार्च 2020 दरम्यान प्रत्येक सोमवारी 3.00 वाजता नागपूर येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी 06.15 वाजता सोलापूर येथे पोहचणार आहे. ही गाडी खेड, अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेर, धामनगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीत 1 वातानुकूलित 2 टियर, 2 वातानुकूलित 3 टियर, 10 शयनयान श्रेणी, 5 सामान्य द्वितीय श्रेणी अशी डब्बांची रचना असणार आहे.

सोलापूर-नागपूर-सोलापूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 02113 ही 16 जानेवारी ते 26 मार्च 2020 पर्यंत प्रत्येक गुरुवारी 01.00 वाजता सोलापूर येथून रवाना होणार असून दुसऱ्या दिवशी 05.15 वाजता नागपूरला पोहचणार आहे. गाडी क्रमांक 02114 ही 17 जानेवारी ते 27 मार्च 2020 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी नागपूर येथून 9.40 मिनिटांनी सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी01.10 मिनिटांनी सोलापूर येथे पोहचणार आहे. ही गाडी कुटूंवडी रोड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेर, धामनगाव आणि वर्धा स्थानकात थांबणार आहे. या गाडीमध्ये 1 वातानुकुलित 2 टियर, 2 वातानुकुलित 3 टियर, 10 शयनयान श्रेणी, 5 सामान्य द्वितिय श्रेणीचे डब्बे जोडण्यात येणार आहेत.(तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान घरी चोरी झाल्यास मिळणार 1 लाख रुपयांचा विमा)

Tweet:

गाडी क्रमांक 0211,02112,02113 आणि 02114 सुपरफास्ट विशेषसाठी आरक्षण करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना सर्व पीआरएस केंद्र आणि संकेस्थळावरुन 5 जानेवारी पासून तिकिट बुकिंग सुरु करण्यात आले आहे. या गाड्यांसाठी सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्बे आरक्षित डब्ब्यांप्रमाणे चालवले जाणार आहेत. याची बुकिंग युपीएस प्रणालीच्या माध्यमातून करता येणार आहे.