Santosh Bangar (फोटो सौजन्य - फेसबुक)

Case Registered Against Santosh Bangar: शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मतदारांना आणण्यासाठी फोन पे करून पैसे पाठवतो, असं वादग्रस्त वक्तव्य संतोष बांगर यांनी एका कार्यक्रमामध्ये केलं होतं. या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेचे संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

काय म्हणाले होते संतोष बांगर -

व्हिडिओमध्ये संतोष बांगर यांनी म्हटलं आहे की, 'जे मतदार बाहेर आहेत त्यांची यादी येत्या 2-3 दिवसांत आम्हाला सादर करावी. त्यांना वाहने भाड्याने घेण्यास सांगा आणि त्यांना हवे ते मिळाले पाहिजे. त्यांना फोन पेने पैसै पाठवले जातील. त्यांना सांगा की ते आमच्यासाठी येत आहेत. बाहेर राहणाऱ्या मतदारांनी मतदानासाठी गावात यावे.' (हेही वाचा - MLA Santosh Bangar Viral Video: 'मत द्या नाहीतर दोन दिवस जेवण करु नका', आमदार संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला)

बांगर हे 2019 मध्ये अविभाजित शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. पक्षाचे विभाजन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दर्शवला. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पीटीआयला सांगितले की, 'मी आतापर्यंत (बांगर यांच्या भाषणाचा) व्हिडिओ पाहिला नाही. पण आमची टीम आहे आणि ते लक्ष ठेवून आहेत. आम्ही व्हिडिओ तपासू आणि आवश्यक असल्यास कारवाई करू. (हेही वाचा -Santosh Bangar: आमदार संतोष बांगर आईला डोलीत बसवून वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, रविवारी कळमनुरी पोलिसांनी बांगर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 170 (1) (1) आणि 173 (लाचखोरी) नुसार गुन्हा नोंदवला आहे.