Amravati Bus Accident: राज्यात अपघाताची मालिका काही संपेना. बुलढाण्यात ट्रॅंकर ट्रॉलीचा अपघात घडला, ही घटना ताजी असताना आज अमरावती येथे एका खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात ५० प्रवाशी जखमी झाले आहे. हा अपघात सेमाडोहाजवळ वळणावर झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अनियंत्रित बस घसरली आणि थेट पूला खाली कोसळली. (हेही वाचा- बुलढाणा येथे टॅंकर ट्रॉली पलटल्याने भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात परतवाडा धारणी मार्गावर खासगी बस पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात 50 प्रवाशी जखमी झाले आहे तर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडून आला अशी माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच,स्थानिकांनी मदतीचा हात पुढे केला.
खासगी बस अपघात
A bus has rolled down a gorge in Maharashtra's Amravati. There were 50 passengers onboard the bus at the time of the accident, all have received injuries. Rescue operations are underway.#Maharashtra pic.twitter.com/07MJD9yIgG
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) September 23, 2024
अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. पोलिसांनी जखमींना सेमाडोहा येथील रुग्णालयात जखमींना दाखल केले. अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांकडून मदतकार्य सुरु झाले. हा अपघात कसा घडला याची तपासणी सुरु आहे.