Photo Credit- X

Buldhana Road Accident: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉंक्रिटने भरलेला ट्रॅंकर ट्रॉली पलटी झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहे.  अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले.  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे एकीकडे  नागरिक चिंतेत आहे. (हेही वाचा- बीकेसीमध्ये उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये वाहतूक निर्बंध जारी)

मिळालेल्या माहितीनुसार, टॅंकर ट्रॉली पलटल्याने हा अपघात घडला. या अपघातात तीन जण जखमी झाले. तीन जखमींपैकी एक जण २२ वर्षीय व्यक्ती अग्निवीर इच्छुक होता त्याने भरती परिक्षा उतीर्ण केली होती. पुन्हई गावाजवळ एका वणळावर हा अपघात घडला. या अपघाता दोन जणांचा मृत्यू झाला. अपघाताची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त तरुणांची मदत केली. जखमींना मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मंगेश ज्ञानदेव सातव (29) आणि रामदास पुंजाजी बेलोकर (42) अशी मृतांची नावे समोर आली आहे. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूकसेवा सुरळीत केली.