
कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर मुंबई (Mumbai) मध्ये वाढत आहे. सरकार यंत्रणा, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मात्र आता याच योद्ध्यांना विषाणूची लागण होण्याचा धोका उद्भवत आहे. अशात कोविड-19 मुळे संसर्ग झाल्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या नातेवाईकांना, 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा पालिकेने (BMC) सोमवारी केली. कोरोना व्हायरसच्या सकारात्मक चाचणीनंतर आतापर्यंत 55 नागरी कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. नागरी संस्थेला 55 पैकी आधीच 10 कर्मचा-यांचे सकारात्मक चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत आणि आता त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या भरपाईची रक्कम येत्या काही दिवसांत दिली जाईल. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
याआधी कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांना दहा लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा, मे महिन्यात बीएमसीने केली होती. मात्र कर्मचारी संघटनांच्या दबावामुळे ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सर्व नागरी कर्मचार्यांच्या नातलगांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आतापर्यंत 1712 कर्मचाऱ्यांची कोविड-19 साठी सकारात्मक चाचणी आली आहे. त्यामध्ये अग्निशमन दल, घनकचरा आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांतील कर्मचार्यांचा समावेश आहे.
याबाबत एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, ही रक्कम प्राप्त करण्यासाठी, कर्मचार्याने त्याच्या मृत्यूच्या 14 दिवस आधी काम केले असावे. दरम्यान, लॉक डाऊन कालावधीत महानगरपालिकेच्या अनेक कर्मचार्यांनी सर्व प्रकारची कामे केली आहेत, विशेषत: विविध वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या फ्रंट लाइन कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. (हेही वाचा: Coronavirus Updates: मुंबई महापालिका उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू)
आतापर्यंत कोरोनासाठी सकारात्मक चाचणी आलेल्या 1712 कर्मचार्यांपैकी, 1,040 कर्मचार्यांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, कोविड-19 च्या कारणावरून मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या कर्मचार्याच्या चाचणी अहवालावर शंका असल्यास, मुख्य नागरी रुग्णालयांमधील सर्व डीनची समिती भरपाईबाबत मार्गदर्शन करणार आहे. ही भरपाई प्राप्त करण्यासाठी नातेवाईकांना ओळखपत्र, कोरोना चाचणी अहवाल, रुग्णालयाकडून देण्यात येणारा मृत्यूचे सारांश पत्र अशी काही कागदपत्रे दाखवणे गरजेचे आहे.