मुंबईत येणार प्लास्टिक चे रस्ते; पुर्नवापरासाठी BMC ने लढविली नामी शक्कल
Mumbai Plastic Road (Photo Credits: Wikimedia)

मुंबईतील प्लास्टिकचा (Plastic) वापर कमी व्हावा आणि प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेला वेगवेगळी शक्कल लढवावी लागते. मात्र प्लास्टिकचे विघटन होणे हे म्हणावे तितके सोपे नाही. सध्या तरी प्लास्टिकचा वापर कमी होत चालला असला तरी याआधी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकचे विघटन कसे करायचे हा मोठा प्रश्न महापालिकेसमोर आहे. म्हणून महापालिकेने नवीन शक्कल काढत येत्या काळात मुंबईत प्लास्टिकचे रस्ते बवनण्याची योजना आखत आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, प्लास्टिक रस्त्यांबाबत निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे असे पालिकेचे रस्ते अभियंता संजय दराडे यांनी सांगितले आहे.

मुंबईत साचलेल्या प्लास्टिकमुळे गटार, नाल्यात पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे मुंबईत रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचते. मुंबईत आलेल्या महाप्रलयाचे मुख्य कारणही प्लास्टिक होते. म्हणूनच या प्लास्टिकचा पुर्नवापर असे केल्यास प्लास्टिकचे विघटनही होईल आणि मुंबईकरांची प्लास्टिकमुळे होणा-या प्रदूषणापासून सुटका ही होईल. त्यामुळे रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर करावा असा उपाय सुचविण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरपासून भारत का नाही झाली 'प्लास्टिक बंदी', ही आहेत कारणे?

गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टिक रस्त्याबाबत प्रयोग सुरु होते. प्लास्टिक रस्त्यांबाबत हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्लास्टिकच्या रस्त्यांमध्ये डांबरी रस्त्याच्या मिश्रणात 6 ते 8 टक्के निरुपयोगी प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे. 2 ऑक्टोबरपासून भारतात प्लास्टिक बंदी होणार होती मात्र प्रत्यक्षात न होता भारतात (India) अजूनही पुर्णपणे एकदा वापरात येणा-या प्लास्टिकवर पुर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भारतात आलेले मंदीचे सावट. प्लास्टिक बनवणा-या कंपन्यांची किंमत 7.5 कोटी इतकी आहे ज्यात 7 कोटी लोक काम करतात. त्यामुळे जर का हा उद्योग बंद झाला तर 7 करोड लोकांची नोकरी जाऊ शकते.