मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शहरातील सार्या लाभार्थ्यांनी कोरोना लस घेतलेल्या रहिवाशांच्या इमारती ओळखण्यासाठी खास क्यूआर कोड (QR Code) आणि लोगो डिझाईन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. नुकतीच आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकार्यांसोबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी अधिकार्यांसोबत एक बैठक घेतली आहे. मुंबई मधील कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात याची त्यांनी अधिकार्यांसोबत बसून एक बैठक घेतली. नक्की वाचा: Mumbai 5th Sero Survey: मुंबईमधील 86.64% लोकांमध्ये आढळल्या Covid-19 अँटीबॉडीज; जाणून घ्या सीरो सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबी.
ठाकरेंच्या कार्यालयातून जारी स्टेटमेंटनुसार. त्यांनी मुंबई महानगर पालिकेला स्पेशल लोगो आणि क्यु आर कोड रहिवासी इमारतींच्या प्रवेशद्वारांवर, कमर्शिअल बिल्गिंडच्या प्रवेशद्वारावर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्यूआर कोडच्या माध्यमातून रहिवासी तसेच कमर्शिअल बिल्डिंग मधील रहिवासी कोविड 19 लसवंत असल्याची माहिती देतील.
जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या मिटींगमध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दुसरा डोस देण्याकडे तसेच कामानिमित्त बाहेर पडणार्यांना दुसरा डोस देण्यामध्ये वाढ करावी असे देखील सूचवण्यात आलेले आहे.
मागील आठवड्यामध्ये मुंबईत केवळ महिलांना कोविड 19 लसीचे डोस देण्याची विशेष मोहिम राबवण्यात आली होती. पालिकेने या माध्यमातून दिवसभरात सुमारे 1.27 लाख महिलांना लस दिली होती.