मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत (Brihanmumbai Municipal Corporation School) शिकणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरीसाठी प्राधान्य मिळणार आहे.
बीएमसी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरीसाठी प्राधान्य मिळावं, अशी मागणी शिवसेनेने केली होती. या मागणीला मंजूरी मिळाली असून आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. आता आयुक्त यासंदर्भात काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाचवी ते आठवी पर्यंतच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार; केंद्र सरकारचा नवा निर्णय
पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरु असलेली गळती थांबावी, मुलांची शिक्षणातील रुची वाढावी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच यामुळे पालिकेच्या शाळेत घालण्याचा पालकांचा कलही वाढेल आणि अर्धवट शाळा सोडून देणाऱ्या वाढत्या विद्यार्थी संख्येलाही आळा बसेल. कलेक्टरची मुलगी शिक्षणासाठी अंगणवाडी शाळेत; हायफाय स्कूलचा हट्ट धरणाऱ्या पालकांना धडा
मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारावा, याकरीता बीएमसी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात येणार आहे.
शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता या दोन बाबींमुळे बीएमसी शाळांकडे विद्यार्थी, पालक पाठ फिरवतात. मात्र या निर्णयामुळे चित्र बदलण्याची शक्यता आहे.