Construction | Representational image (Photo Credits: pxhere)

BMC Air Pollution Guidelines: शहरामधील वायू प्रदूषण वेळीच रोखण्यासाठी मुंबई महापालिका सक्रीय झाली आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. महापालिकेने सुरुवातीला मार्गदर्शक तत्वे जारी केली. आता त्यानंतर अंमलबजावणी सुरु केली असून कारवाईचा पवित्रा गेतला आहे. शहरातील बांधकामे आणि इतर कारणांमुळे उडणाऱ्या धूळीचा बंदोबस्त (BMC On Dust Mitigation Norms) करण्यासाठी पालिकेने कंत्राटदार आणि बिल्डर्सना 15 दिवसांची मूदत दिली आहे. त्यासाठी जवळपास 27 कंत्राटदार आणि 97 बांधकाम व्यवसायिकांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये म्हटले आहे की, निश्चित वेळेच्या आत बांधकामांच्या ठिकाणी स्प्रिंकलर, स्मॉग गन यांसह विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात याव्यात अन्यथा कारवाई केली जाईल. महतत्त्वाचे म्हणजे महापालिकेने मेट्रो, एमएमआरडीए यांच्यासह रस्ते, उड्डाणपूल, खोदकाम, अशी विविध कामे सुरू असलेल्या कंत्राटदारांनाही नोटीस पाठवली आहे.

वायू प्रदूषण समस्या

पाठिमागील काही महिन्यांपासून मुंबईतील हवेची पातळी कमालीची घसरली आहे परिणामी नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नजिकच्या काळात हे प्रदुषण थांबले नाही तर भविष्यात आणखी गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा अभ्यासक आणि तज्ज्ञ देऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने कारवाई सुरु केली आहे. याबाबत पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, सर्व बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांनी स्प्रिंकलर आणि स्मॉग गन घेईपर्यंत मूलभूत प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठीच पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.

वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्श तत्वे

मुंबई महापालिकेने वायू प्रदूषण नियंत्रणासाठी यापूर्वीच मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्यामध्ये सार्वजनिक, खासगी इमारत बांधकामांच्या ठिकाणी आच्छादनांचा वापर करावा. खास करुन बांधकाम सुरु असलेली ठिकाणे पत्रे, ताडपत्री, कापडी जाळी आदींचा वापर करावा. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी राडाडोडा उडणार नाही याची दक्षता घ्यावी. खास करुन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ट्रक अथवा इतर वाहनांमुळे धूळ उडून ती परिसरात पसरु नये यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा माराकरणे आवश्यक असल्याचेही या तत्त्वांमध्ये म्हटले आहे. पालिकेने या तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी साधारण महिनाभराचा कालावधी दिला आहे.

वायू प्रदूषण

वायू प्रदूषणामध्ये हवेतील रसायने किंवा कण असतात जे मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे इमारतींचेही नुकसान होते. हवेतील प्रदूषक अनेक प्रकार धारण करतात. ते वायू, घन कण किंवा द्रव थेंब असू शकतात. प्रदूषण पृथ्वीच्या वातावरणात विविध मार्गांनी प्रवेश करते. बहुतेक वायू प्रदूषण कारखाने, कार, विमाने किंवा एरोसोल कॅनमधून उत्सर्जनाचे स्वरूप घेऊन लोकांद्वारे तयार केले जाते. प्रदूषणाच्या या मानवनिर्मित स्रोतांना मानवनिर्मित स्रोत म्हणतात.